संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार?


मागील पंधरवड्यापासून अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे आज, मंगळावारी (दि. २३) पोहरादेवीला येत असल्याची माहिती देवस्थानच्या महतांनी दिली आहे. शिवाय शासकीय यंत्रणेनेसुद्धा यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी ते मौन सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. तिचा नेमका मृत्यू कसा झाला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.
(Advertise)

पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर दुसरीकडे सुरू असलेली नाहक बदनामी थांबवा या मागणीसाठी समाजबांधव व समर्थकांकडून जिल्हाभरात मोर्चे काढले जात आहेत.

(Advertise)

राठोड यांच्या स्वागतासाठी बंजारा समाजाचे काही व्हॉट्स अॅप ग्रुप सक्रिय झाले असून "चलो पोहरादेवी' ही मोहीम व्हॉट्स अॅप चालवली जात आहे. वाशीम जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला असल्याने जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे राठोड आले तरी कार्यक्रम होईल की नाही याबाबत साशंकता आहे. धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे  मूर्ती स्थापनेकरिता कर्नाटकला गेले असल्याने त्यांची अनुपस्थिती राहणार आहे. मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास संजय राठोड हे कुटुंबियासह पोहरादेवीत पोहचतील. याठिकाणी सर्वप्रथम जगदंबा देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेवून माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Post a Comment

0 Comments