पंढरपूर/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी चौकशी दरम्यान तपास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दादासाहेब देठे यास प्रचंड दबावाखाली घेतले आणि बेदम मारहाण केली. त्यातूनच दादासाहेब देठे या तरुणांने घराबाहेरील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तरुणांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
चिक-महूद येथील दादासाहेब देठे या तरुणांनी अकरावीमध्ये शिकणारे अल्पवयीन मुलीस पुश लावुन पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या भावाने सांगोला पोलीस स्टेशन मध्ये दिली होती याप्रकरणी संशयित दादासो देठे, त्याच्या आईसह नातेवाईक व अल्पवयीन मुलगी तिचे नातेवाईक यांना महुद येथील पोलीस चौकीला बोलावून दोन्ही बाजूकडील जाबजबाब घेतले, दरम्यान तपासी अधिकारी गणेश मेटकरी यांनी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची वैद्यकीय तपासणी करावी लागेल असे सांगताच दादासो देठे यांनी भूक लागली आहे. नास्ता करून येऊ असे म्हणून आईसह चौकीतून बाहेर गेले ते परत आलेच नाहीत. त्यानंतर सोमवारी त्याने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले, असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. मृताची आई इंदूबाई शंकर देठे, रा.चिकमहुद हिने खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
दादासाहेब यास पोलिसांकडून चौकशी दरम्यान दमदाटी व मारहाण केली होती त्यातूनच दादासाहेब घरी आल्यानंतर पोलिसांच्या भीतीने घरासमोरील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप देते यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सदर तपास अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत कुटुंबीयांची समजूत काढून योग्य तो तपास केला जाईल, असे सांगितल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगोल्याला पाठवण्यात आला.
0 Comments