फॅन्ड्रीतला 'जब्या' लवकरचं नव्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला


 पहिला सिनेमा 'फॅण्ड्री' २०१३ साली प्रदर्शित झाला. या सिनेमाने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या सिनेमातून नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दिग्दर्शक सुनील मगरे दिग्दर्शित‘फ्री हिट दणका’ या आगामी सिनेमात सोमनाथ झळकणार आहे. सोमनाथच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. यापूर्वीच या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी जाहीर करण्यात आली आहे. वॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सर्वत्र प्रेमाचाच रंग विखुरलेला आहे. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटा पोस्टरमध्ये लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे. तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments