शिवकन्या सुरक्षा समितीचे कार्य कौतुकास्पद - आमदार अरुण लाड


करमाळा/ प्रतिनिधी :

 विधानपरिषद सदस्य अरुण लाड हे आज करमाळा दौऱ्यावर आले असता शिवसेना महिला तालुका प्रमुख तथा शिवकन्या बहुउद्देशीय संस्था संचालित शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गायकवाड यांनी आमदार लाड यांना महिला व मुलींसाठी चालू केलेल्या शिवकन्या सुरक्षा समितीस सहकार्य करणेबाबत लेखी निवेदन दिले.  तसेच समितीचे कार्य, उद्देश व धेय्य धोरणे थोडक्यात विशद केले. 

(Advertise)

सदर निवेदन स्वीकारल्या नंतर आमदार लाड यांनी शिवकन्या सुरक्षा समिती राबवित असलेल्या उपक्रमबाबत जमेल तेवढे सहकार्य करू आपले कार्य कौतुकस्पद असून आम्ही आपल्या या सामाजिक कार्यासाठी सर्वोतोपरी तत्पर असल्याचे आश्वासन लाड यांनी दिले. तसेच यावेळी समितीच्या उत्तम कार्याबद्दल आमदार लाड यांनी प्रियांका गायकवाड यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments