शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालावे, खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी



 वडीलकीच्या नात्याने शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालावे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली.

खा. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भेट घेतली असून आरक्षणाबाबत लक्ष घाला, अन्यथा उद्रेक होईल असं त्यांना सांगितले. आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात वकिलांकडून योग्य मांडणी झाली नाही, असंही निरीक्षण त्यांनी भेटीदरम्यान नोंदवलं. राज्य सरकारनं लवकरात लवकर योग्य तोडगा काढणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments