देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते नारायण राणे हे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस आणि राणेंवर निशाणा साधला.
गेल्या २२ वर्षापासून नारायण राणे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता देवेंद्र फडणवीस जोडीदार भेटले आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. फडणवीस वारंवार सरकार पडणार असल्याचं म्हणत आम्ही फासा पलटवणार असल्याचं म्हणतात. यावरूनही नबाव मलिकांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. मात्र देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू अशी भाषा करत आहेत. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नसल्याचं नवाब मलिक म्हणाले. याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यममत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीवरही मलिकांनी टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात. या भेटीनंतर ते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचं मलिक म्हणाले.
0 Comments