बार्शी! सामजिक बांधिलकी जपत दडशिंगे गावांत 'शिवरत्न प्रतिष्ठान' वतीने ५२ रक्तदात्यांनी केलं रक्तदान


बार्शी/प्रतिनिधी:

मौजे दडशिंगे येथे सालाबादप्रमाणे यंदा वर्षी शिवरत्न प्रतिष्ठान ने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केलं हे मंडळाचे १३ वे  वर्षे असून ही रक्तदानाची परंपरा अखंडित पणे चालूं आहे.

"या वक्त का हर क्षण और रक्त का हर कण अमूल्य आहे, तसेच जो और के लिए रक्तदान नही कर सकते वो अपनो कि जरुरत पर दुसरो से अपेक्षा क्यों रखते हैं?" या उदात्त हेतूने हे शिबीर दरवर्षी अविरत पणे आयोजित केलं जात.  संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशिद तसेच सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबादचे डॉ दिग्गज धापके देशमुख, सह्याद्री ब्लड बँकेचे चेरमन शशिकांत करंजकर  यांच्या हस्ते करण्यात आलं.

(Advertise)

 या शिबिराचे प्रास्ताविक आणि आभार माजी उपसरपंच पांडुरंग घोलप यांनी केलं थेंब आहे रक्ताचा आधार आहे, जीवनाचा या शिबिरासाठी सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांचे सहकार्य लाभले, या शिबिरासाठी पांडुरंग काळे, गणेश कदम, सुजित घोलप, रणजित मोरे, धनाजी घोलप, समाधान घोलप,  रियाज पठाण, योगेश काळे, आकाश घोलप, आकाश काळे, सौरभ तांबिले, बाळासाहेब घोलप, शांतीलाल नरुटे, काकासाहेब घोलप, चत्रभुज काळे, गणेश बाळासाहेब नरुटे,  बाळासाहेब सुरवसे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी रक्तदान शिबीर पाडण्यासाठी परिश्रम घेतलं मंडळाच्या वतीने या पुढील काळात पण ही निस्वार्थी सेवा काय चालूं ठेवण्यात येईल असं मंडळाचं अध्यक्ष धनाजी घोलप यांनी उपस्थिताना शब्द दिला.

Post a Comment

0 Comments