जेजुरी मंदिर परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेमेंढपाळाच्या हस्ते केले. पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते.मात्र, त्याआधीच पडळकर यांनी आज या पुतळ्याचे अनावरण केले.
यानंतर मात्र गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी हा वाद उफळणार हे निश्चित होत. त्यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद एवढा पेटला की, दोन्ही आमदारांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली.
उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका सुद्धा केली होती . शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं.
0 Comments