केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेने संदर्भात केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. ते आज नागपुरात बोलत होते.
भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. तसेच, अजूनही जीएसटीचे ३५ हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते ते येत नसल्याचेही अजित पवार म्हणाले.
आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय करतो, विसंवाद नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपपेक्षा बरेच पुढे राहिलो, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
0 Comments