साखर कारखान्याच्या चेअरमनने रेल्वेखाली उडी मारून केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात खळबळ



दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर साखर कारखान्याचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे वय ६२ यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

भगवान दत्तात्रय शिंदे वय ६२ राहणार सोलापुर सोसायटी पंखा बावडी जवळ आज सकाळी सातच्या सुमारास रेल्वे ब्रीज मोदी रेल्वे ब्रिज वर डाव्याबाजूला पहिल्या पटरीवर मृतावस्थेत आढळून आले.

 त्यांचा मृतदेह सिविल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे ते मुख्य संचालक होते अशी माहिती आहे.

 

Post a Comment

0 Comments