"आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मला अडकवलं जात असून माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रीया संजय राठोड राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या सर्व प्रकरणात होणाऱ्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या बदनामीवरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं  आहे. त्या पत्राच्या शेवटी पूजाची बहीण, आई आणि वडीलांची स्वाक्षरी आहे. वाचा सविस्तर या पत्रात त्यांनी काय म्हटलं आहे.

महोदय, आमची मुलगी पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला कुठल्याही माता-पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्य मंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत. आपण या संदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे.

आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाच्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीचर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्याल.

आपले नम्र

लहू चंदू चव्हाण (वडील), मंदोधरी लहू चव्हाण (आई). दिव्याणी लहू चव्हाण (बहीण)

अशाप्रकारे पत्राद्वारे पूजाच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली आणि आपल्या समाजाची बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई करू नये असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

Post a Comment

0 Comments