राजकीय प्रचारात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका असल्यानं सत्ताधारी भाजपाच्या 'आयटी सेल'ला काँग्रेस 'सोशल मीडिया वॉरिअर्स'च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. ५ लाख सोशल वॉरिअर्सची काँग्रेसकडून भरती केली जाणार असल्याची शक्यता आहे.
५ लाख जणांची भरती होण्याची शक्यता-
सोशल मीडिया पेजचं काम करण्यासाठी काँग्रेसकडून लवकरच ५ सदस्यांची भरती केली जाणार असून, त्याविषयी सोमवारी हेल्पलाईनची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून ५ लाख सोशल मीडिया वॉरिअर्सची भरती केली जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ५० हजार पदाधिकाऱ्यांची निवड पक्षाकडून केली जाणार आहे. ज्यांच्या मदतीसाठी साडे चार लाख कार्यकर्ते असणार आहे. सोशल मीडियाला समर्पित वेब पेजेससोबतच एक हेल्पलाईन नंबर सुरू केला जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून ज्यांना सोशल मीडिया टीममध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांची माहिती संकलित करणार आहे. काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, 'सोशल मीडिया टीममध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांची आधी चौकशी केली जाणार आहे. ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जाणार आहेत,' अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
0 Comments