पंढरपूर/प्रतिनिधी:
कर्नाटक राज्यातून एका आलिशान कारमध्ये पानमसाला व गुटख्याची तस्करी करणारे दोघा जणांना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे पानमसाला व गुटखासह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
कारवाईत दोन आरोपींना अटक
कर्नाटकातून पुण्याला पानमसाला व गुटखा घेऊन जाणाऱ्या आरोपींची नावे आहेत निलेश चंद्रकांत मेहत्रे (वय २८ रा. सासवड जि. पुणे) व निखिल मनोज पोद्दार (वय २५ रा. सासवड जि. पुणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दोघा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चडचण येथून पुणे येथे पानमसाला व गुटका घेऊन जात असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे सापळा रचून (एम एच १२ एस यु ७१५६ ) या आलिशान गाडीची तपासणी केली असता. त्या पानमसाला व गुटखा आढळून आला. सदर पान मसाला व गुटख्याची किंमत दोन लाख रुपये सांगण्यात आली आहे तर आलिशान गाडीची किंमत सात लाख रुपये आहे. असे एकूण नऊ लाखाचा अशा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0 Comments