योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा कोरोनावर मात करणारे औषध तयार केला असल्याचा दावा केला आहे. याआधी त्यांनी एक दावा केला होता. यावेळी तयार करण्यात आलेल्या औषधाने कोरोना रुग्ण हा केवळ ३ दिवसात पूर्णपणे बरा होतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत.
बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.
शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
0 Comments