शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी या गावांमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये मध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादामध्ये गटांकडून डोळ्यात चटणी टाकून कोयता आणि गजाने मारहाण केली आहे. यामध्ये एका लहान मुलास तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी कौठाळी गावांमध्ये झाली. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

(Advertise)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील यांनी नऊ फेब्रुवारी रोजी भावकी मधील शहाजी पाटील व हरी पाटील यांच्या ऊस संदीप पाटील यांच्या शेतामध्ये पडला होता. त्यावेळी संदीप यांनी पडलेला ऊस काढण्यास सांगितले मात्र दहा फेब्रुवारी रोजी सकाळी संदीप पाटील हे शेताच्या कामासाठी जात असताना. शहाजी हरी पाटील, समाधान पाटील, बालाजी पाटील, सोमनाथ पाटील यांनी आम्हाला ऊस काढायला लावतो म्हणून संदीप पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संदीप यांच्या डोळ्यात चटणी टाकून तुला लय मस्ती आली आहे. पडलेला ऊस सार असे सांगणारा तू कोण असे म्हणत संशयित आरोपी समाधान पाटील याने हातातील लोखंडी गजाने नाकावर मारले. तर शहाजी हरी पाटील याने त्याच्या हातातील धारदार कोयत्याने नाकाच्या व ओठावर कोयत्याने वार केला. संदीप पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या भाऊ नंदकुमार पाटील व मुलगा अथर्व हे भांडण सोडवण्यासाठी आले असता शहाजी पाटील याने त्यांच्यावर डाव्या हाताच्या बोटावर व तळव्यावर कोयत्याने वार केले. अथर्वच्या डाव्या बाजूच्या पायावर मार बसला. या वेळी इतर नातेवाइकांनी सोडवासोडवी केली. त्यानंतर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देऊन संशयित आरोपी निघून गेले. अशी फिर्याद देण्यात आली आहे.

(Advertise)

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. येथे सर्व आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोध मोहिमेसाठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून पथके रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोंदे हे करीत आहेत. पंधरा दिवसांमधील पंढरपूर तालुक्यात गटांमधील हाणामारीचे दुसरा प्रकार आहे.

Post a Comment

0 Comments