भारत आणि इंग्लंडदरम्यानचा हा दुसरा कसोटी सामना आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी जिंकत इंग्लंडनं १-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिला कसोटी सामना हरल्यानंतर विराट कोहलीवर मोठी जबाबदारी होती. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यातही पुजारा पाठोपाठ त्यानेदेखील शून्यावर बाद होत भारताच्या आशा मालवल्या. त्यावेळी भारताची धावसंख्या ८६ वर ३ बाद अशी होती. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागीदारी भारताला नव्या वळणावर नेत आहे. रोहित १३२ वर तर अजिंक्य ३६ धावांवर नाबाद आहे.
रोहित शर्माने शानदार शतक ठोकून रहाणे सोबतीनं भारताचा डाव सावरला, त्यावेळी भारत १४८ वर ३ अशी धावसंख्या बाळगून होता.
0 Comments