कोरोना: बनावट लशीचा पुरवठा; ८० हून अधिकजणांना अटक


चीन पोलीसांची कारवाई

 बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ८० हून अधिकजणांना अटक केली आहे. टोळीकडून तीन हजारांहून अधिक बनावट डोस जप्त करण्यात आले आहे.

 या टोळीकडून मागील सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लशींचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लशींच्या मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. या बनावट लशी परदेशातही पोहचवण्याचा या टोळीचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता चीन सरकारचे वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने वर्तवली.

 पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत तीन हजारांहून अधिक डोस जप्त करण्यात आले असून ८० हून अधिकजणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments