शिवसेनेत कोणी मर्द उरला आहे का? नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल


पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आवाज उठवल्याप्रकरणी माझ्या सहकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. मला एकही फोन आला नाही. एकदा कॉल मला पण टाका न... पाहूया शिवसेनेत कोणी मर्द उरला आहे का? असे ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे.

मला फोन येत नाही, याचं दुःख झालं आहे. मलाही फोन करा, मलाही बरं वाटेल. माझा नंबरही देतो, घ्या फोन करा. फोन आला तर बाकीच्या गोष्टींवर मीही बोलू शकतो ना. एका मुलीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष जबाबदारी म्हणून पुढे येत आहे. सरकार न्याय देत नाही” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याचा दावा केला जात आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता.

Post a Comment

0 Comments