सोलापूर जिल्हा दूधसंघ सह, विठ्ठल, पांडुरंग, भीमा व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा


पंढरपूर/प्रतिनिधी:

गेल्या वर्षभरापासून लावणीवर पडलेल्‍या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची आर्थिक नाळ असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या काही काळामध्ये होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्हा दूध संघ पांडुरंग सहकारी कारखाना विठ्ठल  साखर कारखाना  श्री संत दामाजी कारखाना तसेच भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत

सोलापूर जिल्ह्यातील तील सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे सहकार क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढाल जास्त होत असल्यामुळे या निवडणुकीचे महत्त्व वाढली आहे सोलापूर जिल्ह्यात सहकारी दूध उत्पादन संघाच्या मतदार यादी विषयी व स्पष्टता होती त्यातूनच करुणा महामारी मुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुका या लांबणीवर पडले होते .

(Advertise)

माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी कारखान्याची मुदतही संपली आहे या कारखान्यात परिचारक गटाची सत्ता आहे क्रियाशील आणि क्रियाशील सभासदांचा मुद्दा निवडणुकी ऐरणीवर येणार आहे २६ जानेवारी २०१९ रोजी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपली आहे त्यातच दिवंगत आमदार भारत नाना पाटील यांची एकहाती सत्ता होती मात्र त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्याकडे चेअरमनपद आहे त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुका लवकर होण्याची चिन्हे आहेत येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले.

मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान असणारे संत दामाजी सहकारी कारखान्याच्या निवडणुका लागणार आहे संचालक मंडळाची मुदत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पूर्ण होत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदारकीची निवडणुकीपूर्वी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत अवताडे गटाकडे या कारखान्याचे सूत्र आहेत. मोहोळ तालुक्‍यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २७ मार्च २०२१ रोजी पूर्ण होत आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

0 Comments