एफएफआय चीटफंट कंपनीचे मालक आनंद उनवणे (वय ४५) हे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत आनंद उनवणे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
“आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेजारील राज्यांसोबत मृतदेहाचे फोटे शेअर केले आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि आनंद उनवणे यांचे नातेवाईक रविवारी घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद उनवणे यांच्या भावाने ५ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
0 Comments