शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज !


 भारतात (शुक्रवारी) सीएनजी ट्रॅक्टर लाँच होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ट्रॅक्टरचे लाँचिंग करण्यात येणार आहे. हा देशातला पहिला सीएनजी ट्रॅक्टर आहे.

सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा इंधनाचा जवळपास एक लाख रुपयांचा खर्च वाचेल. शिवाय, शेतात जाळल्या जाणाऱ्या पेंढ्यामुळे बायो-सीएनजीची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे येत्या दिवसांमध्ये प्रदूषण कमी होईल. बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील पेंढा किंवा गवताचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर केला जाऊ शकतो. 

ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत: च्या क्षेत्रात बायो-सीएनजी युनिट्स तयार करण्यास मदत होईल. म्हणजे या ट्रॅक्टरमुळे केवळ आर्थिक बचतच नव्हे तर पर्यावरणाचीही मदत होईल. सीएनजी ट्रॅक्टरमुळे कृषी क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो असं सरकारने लाँचिंगआधी ट्रॅक्टरच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देताना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments