संतापजनक! आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केला बलात्कार



पुण्यातील विमाननगरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणासंदर्भात विमाननगर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. आरोपीचं नाव दिलीपकुमार गोस्वामी असून तो २० वर्षांचा आहे.

 दिलीपकुमार विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. पिडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत लेबर कॅम्पमध्ये राहते. तिचे आई-वडिल दोन्हीही नोकरी करतात. एक दिवस आई-वडिल कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या चिमुरडीला आरोपीनं घेरलं. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी दिलीपकुमारने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं आणि तो काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पिडित चिमुरडीवर सध्या पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments