महाविकासआघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आज महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या टिका केली आहे. राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे अशी बोचरी टीका यशोमती ठाकूर यांनी राज्यपालांना भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली आहे. त्या आमदार विक्रम सावंत यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या .
सांगलीत कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी होती. दादांनी मला सांगितलं की तिथं गव्हर्नर म्हणून एक विक्षिप्त माणूस बसलेला आहे. मीडियावाल्यांना हे दाखवायचं असेल तर दाखवा. तुम्ही आम्ही संविधानाने एकत्र जोडलो आहोत म्हणून एकत्र आलोय. त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसलाय. ते अडथळे आणत आहेत म्हणून सांगलीत कृषी महाविद्यालय होत नाहीये.
आमदार विक्रम सावंत यांना विकासाच्या कामात अगदी खांद्याला खांदा लावून मदत करु. मंत्रिमडळाची सदस्य म्हणूनच नाही तर त्यांची बहिण म्हणून त्यांना मदत करेल. जतला आम्ही दत्तक घेतलं असून या ठिकाणच्या विकासासाठी जे करता येईल ते करु. मंत्रिपद असू अथवा नसू,” असंही त्यांनी सांगितले.
0 Comments