सर्वसामान्य माणसांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कारण, घरगुती सिलेंडरच्या थोडीथोडकी नव्हे तर ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी आता जवळपास ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. १९ किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर १९० रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा १०० रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी २ डिसेंबरला ५० रुपये आणि १५ डिसेंबरला ५० रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.
0 Comments