महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा


 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. 

नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी  दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर होत आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तसंच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केलं जात असून मेक इन इंडिया टॅबचा वापर केला जात आहे.

Post a Comment

0 Comments