इंस्टेंट मेसेजिंग ॲप WhatsApp ने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हेसी पॉलिसीत बदल केला आहे. त्याचे नोटिफिकेशन भारतातील युजर्सना मंगळवारी रात्रीपासून येण्यास सुरुवात झाली आहे. व्हॉटस्ॲपने आपली नवी पॉलिसी एक्सेप्ट करण्यास ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळ दिली आहे.
युजर्सला आपले अकाउंट सुरु ठेवण्यासाठी नवी पॉलिसी एक्सेप्ट करणे जरुरी आहे.जे युजर्स नवीन बदल स्वीकारणार नाहीत त्यांचे अकाउंट हटविले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. याबाबत व्हॉटस्ॲपने युजर्सना कोणताही पर्याय ठेवलेला नाही.
कंपनी युजर्सच्या डाटावर कशी प्रक्रिया करते. व्हॉटस्ॲप चॅट स्टोअर करण्यासाठी फेसबुक होस्ट करत असलेल्या सेवांचा वापर व्यवसायांसाठी कसा करु शकतो, याची माहिती WhatsApp ने युजर्सना दिली आहे.
0 Comments