नागपूर : पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या सेक्स पोझिशन करुन बघण्याच्या नादात नागपुरात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. मयत तरुणाचे आरोपी तरुणीसोबत कोर्ट मॅरेज झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तरुणीवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आह.

मयत २६ वर्षीय तरुण इंजिनिअर होता, मात्र सध्या त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली होती. कुटुंबीयांच्या संमतीने तरुणाचे लग्न झाले असून त्यांना मुलगा आहे. आरोपी २० वर्षीय तरुणीसोबत त्याचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्याने तरुणीशी कोर्ट मॅरेजही केले होते, मात्र याविषयी कोणालाही माहिती नव्हती.

लॉजमध्ये ‘वेगळं काहीतरी’ करण्याचा प्लॅन
संबंधित युवक-युवतीने गुरुवारी (सात जानेवारी) बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर गेले. रुम बुक करुन दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दोघांनी दोरीचा उपयोग केला होता.

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवतीही आवळली गेली. सेक्सनंतर तरुणी बाथरुममध्ये गेली असताना तरुण खुर्चीसह खाली कोसळला. यामध्ये त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.