मुंबई पालिकेचा कंगनाला पुन्हा दणका


सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी मुंबई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद अंगावर ओढवून घेतला होता. त्यातच आता कोर्टाने सुद्धा अनधिकृत बांधकाम प्रकरणी तिला झटका दिला आहे.

सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.

(Advertise)

उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना राणावत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे असे म्हणत तिच्यावर कारवाहीचा बडगा उचलला आहे.

प्रकरण असे की, मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च २०१८ मध्ये, मुंबई महानगरपालिकीने तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली.

Post a Comment

0 Comments