राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बलात्कार प्रकरणी अडचणीत सापडल्यानंतर भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. नाबाब मलिक यांच्या हि राजीनाम्याची बातमी पुढे येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लगावला आहे.
0 Comments