....अखेर आदिनाथ बारामती ऍग्रोकडे ! २५ वर्षाच्या करारावर भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज १२ जानेवारी रोजी राज्य सहकारी बँकेने २५ वर्षे करारावर बारामती ॲग्रो कारखान्यास भाडेतत्वावर चालविण्यास दिला आहे. आदिनाथ कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे १२८ कोटी रूपये कर्ज होते. या कर्जापोटी बँकेने कारखाना जप्त केला होता. त्यानंतर या कारखान्याचा कब्जा बँकेने घेऊन त्यावर विद्यमान संचालक मंडळाकडे प्रशासनाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया चालू केली.

(Advertise)

राज्य सहकारी बँकेने वर्तमात्र पत्रात निविदा प्रसिध्द करून आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ४ जानेवारी उघडण्यात येणार होत्या, परंतु काही त्रुटीमुळे ही तारीख १२ जानेवारी पयरत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आज राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्या समोर या निविदा उघडण्यात आल्या होत्या. या निविदामध्ये बारामती ॲग्रो कारखान्याची निविदा जादा दराची असल्याने त्यांची निविदा बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केली आहे. हा कारखाना राज्य सहकारी बँकेने बारामती ॲग्रो कारखान्याला २५ वर्षे कराराने भाडेतत्वावर चालविण्यास दिला आहे.

(Advertise)

त्यामुळे अनेक दिवसांपासून बारामती ॲग्रो आदिनाथ चालविणार या चर्चेला आता पुर्णविराम मिळालेला आहे. या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे. बारामती ॲग्रो मार्फत २५ वर्षे करार केल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments