मंगळवेढा परिसरात येणारा गुटखा पकडला ; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

 

 कर्नाटक राज्यातून मोटर सायकलवरून मंगळवेढयाकडे येणारा ७ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडून अर्जुन साबळे (वय २८),सर्जेराव साबळे (रा.हंगिरगे ता. सांगोला) या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने गुटखा मंगळवेढयातून अन्य भागामध्ये विक्रीसाठी जात असतो.या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे मंगेश लवटे यांना मिळताच गुरुवारी १०.३० च्या दरम्यान हुन्नूर येथे  सापळा लावला असता वरील दोघे आरोपी एम एच ४५ डब्ल्यू २१३५ या मोटर सायकलवरून अवैधरित्या 7 हजार रुपये किमतीचा गुटखा घेवून जात असताना मिळून आले.

प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे शहरात व ग्रामीण भागामधून पानटपरी,हॉटेल्समधून खुली विक्री होतानाचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments