देशभरात आजपासून कोविड १९ वॅक्सीनेशन कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या अभियानास सुरुवात केली. याला जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान म्हटलं जातंय. पहिल्याच दिवशी ३ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
मात्र, आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडतो की, पहिली लस कोणाला मिळणार? राजस्थानमध्ये जयपूरच्या सवाई मान सिंह मेडिकल कॉलेजचे प्रधानाचार्य सुधीर भंडारी यांना पहिला लसीचा डोस दिला जाणार आहे. मध्यप्रदेशमधील एका रुग्णालयात सुरक्षारक्षक आणि सहायकासहीत सर्व पहिले डोस घेणाऱ्यांमध्ये असतील.
देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता हि लस आली आहे. भारतातील दोन लसींना परवानगी मिळाली आहे. एक म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी लस पोहोचल्या आहेत. तयारी देखील जवळपास पूर्ण झाली असून, आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
0 Comments