मंगळवेढा/प्रतिनिधी :
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी समाधान फुगारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. या सर्वांच्या सहमतीने समाधान फुगारे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
प्रथम पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीत उपाध्यक्षपदी रामा सपताळे, कार्याध्यक्षपदी प्रविण गांडुळे, सचिवपदी दत्ता कांबळे, खजिनदारपदी अविनाश मेटकरी, सहसचिवपदी विलास काळे, सहखजिनदारपदी प्रसाद कसबे, प्रसिद्धी प्रमुखपदी सुनिल कसबे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पुजारी, अॅड.दत्तात्रय तोडकरी, बाळासाहेब नागणे, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, मनोजकुमार अवधूत, बाबासाहेब सासणे, ज्ञानेश्वर भगरे, मोहन माळी यांचेसह विलास मासाळ,तानाजी चौगुले, राजेंद्रकुमार जाधव,भिमराव मोरे, विलास काळे, रोहिदास भोरकडे, अमिर आतार, म्हाळाप्पा शिंदे, नवनाथ देशमुखे, संभाजी मस्के, अक्षय पवार, दादा लवटे, सुरेश केंगार, विजय भगरे, महादेव वाघमारे, बापु मासाळ, सुलेमान तांबोळी, प्रमोद बनसोडे, भारत दत्तु, प्रशांत माळी, प्रल्हाद नाशिककर, वासुदेव जोशी, आदित्य हिंदुस्थानी, संतोष मिसाळ, सचिन हेंबाडे, देवदत्त पवार, प्रतिक भगरे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments