मंगळवेढा १८६ जागेसाठी ४६४ उमेदवारी अर्ज मुदतवाढीसह ३७ सदस्य बिनविरोध



मंगळवेढा/प्रतिनिधी :

मंगळवेढा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील २२३ जागांमधील ३७ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १८६ जागेसाठी  ४६४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात शिल्लक राहिले तर काल दि ४ रोजी ४०५  उमेदवारानी  ४२१  अर्ज माघार घेतले. बिनरोध सदस्यात भोसे चे सर्वात जास्त १० बिनविरोध झाले.

मुढवी ग्रामपंचायतसाठी ९ अर्ज दाखल केल्यामुळे यापूर्वी बिनविरोध झाली. भोसे १० , सलगर बुद्रुक १, हुलजंती २, डोणज १,घरनिकी ६, ममदाबाद शे. १,तामदर्डी ५,अरळी १ ,मल्लेवाडी १ असे मिळून ३७ उमेदवार बिनरोध झाले.
इतर गावातील उमेदवारांची मनधरणी करण्यात गाव पातळीवरील नेत्यांना तडजोड करण्यात अपयश आले.

ग्रामपंचायत निहाय पात्र उमेदवार पुढीलप्रमाणे मरवडे ३५,लमाण तांडा २२,तांडोर १४ ,सिध्दापूर २४, कर्जाळ- कात्राळ १५, आसबेवाडी १४ ,बोराळे २८, गणेशवाडी १५ ,डोणज २४ ,हुलजंती २६, महमदाबाद शे १३
मल्लेवाडी १३, नंदेश्वर ३४, लेंडवे चिंचाळे २१ लवंगी २७ अरळी २२ सलगर बु  माचणूर २०,तामदर्डी ९, मुढवी ९, घरनिकी १२, भोसे २३, कचरेवाडी २० इतके अर्ज शिल्लक राहिले.

Post a Comment

0 Comments