पांगरी पोलिसांना चोरीमधील दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल फिर्यादिस मिळवून देण्यास यश जो एक वर्षांपासून रखडला होता


पांगरी/प्रतिनिधी:

चोरीमधील एक वर्षापासुन जप्त असलेले सोने पांगरी पोलीसांच्या प्रयत्नाने अखेर फिर्यादीस सुपुर्त
मौजे चिखर्डे येथे दि.०३/०५/२०१९ रोजी रात्रौ ०९.०० ते दि.०४/०५/२०२० रोजी सकाळी ०६.०० वाचे दरम्यान नानासाहेब लिंबराज चौधरी यांचे बंद घराचा कोणीतरी अज्ञात चोरटयांनी कड़ी कोयंडा कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता.

त्याबाबत पांगरी पोलीस लकार दाखल होताच पांगरी पोलीसांनी तपासाची सुत्रे हलवुन,गुल्हयात लिन आरोपीना अटक करून त्यांचेकडुन नानासाहेब चौधरी यांचे घरातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागीन्यापैकी ४० गॅम वजनाच्या २ सोन्याचा पाटल्या व १५ ग्रॅम वजनाच्या ३ अंगठया असा एकुण २,४७,००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या होत्या.
(Advertise)

त्यानंतर फिर्यादीने सदर चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणे करीता डा। कोर्ट बार्शी येथे वारंवार अर्ज करून देखील काही तंत्रीक अडचणीमुळे त्यांना मिळु शकला नव्हता त्यामुळे तो मुद्देमाल मागील एक वर्षापासुन पोलीस ठाणेस जप्त होता. त्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांचे सुचनेप्रमाणे फिर्यादीस पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर आनंदराव तोरडमल यांनी संपर्क करून व त्यांना समक्षा बोलावुन त्यांना मुद्देमाल मिळणेबाबत हु।। कोर्टात अर्ज दाखल करणेस सांगितले.

त्याप्रमाणे अर्जदार श्री नानासाहेब चौधरी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभारी अधिकारी तोरडमल यांनी हु।। कोर्ट बार्शी यांचेशी व सरकारी अभीयोक्ता यांचेशी चर्चा करून अर्जदार यांना मुद्देमाल ताब्यात देणेबाबतचा आदेश होणेस विनंती केली. त्याप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने पोलीस रेझींग डे वे औचित्य साधुन अर्जदार नानासाहेब चौधरी रा चिखर्डे यांचे ताब्यात ४० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याचा पाटल्या व १५ ग्रॅम वजनाच्या ३ अंगठया असा एकुण २,४७,००० रू चा मुद्देमाल देण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते  सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर  बार्शी यांचे मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर तोरडमल व त्यांची टिम पोसई सिरसट, पोहेकॉ/सतीश कोठावळे,पोहेका/परबत,पोना/बांगर पोकॉ सुरेश बिरकेल, पोकॉ सुनिल बोदमवाड, पोकॉ/उमेश कोळी चापोकॉ/गणेश घुले व चापोकॉ/धोत्रे यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments