प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी आयोजित कार्यक्रमात मुलींना उदबोधित करण्यासाठी 'निर्भया पथक मार्गदर्शन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना माध्यमिक विद्यालय व कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.एम.एम.रावळ यांनी योग्य वेळ व योग्य वयातच मुलींना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सबळ साथ देणारे व प्रमुख आयोजक श्री.प्रविण पाटील यांनी या कार्यक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, महिला या देशाचे प्रमुख बलस्थान असून त्यांना योग्य मानसन्मान देणे हे पुरुष जातीचे प्रमुख कर्तव्य आहे. तसेच हा देश बलशाही व सशक्त बनवायचा असेल तर त्यासाठी महिलांचे सबलीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व व राज्यात महिलांना जो सन्मान व आदर दिला जात होता किंवा महिलाविषयक आदर्श आई,माता व भगिनी म्हणून जी आपुलकीची व आदराची भूमिका होती. अशा राज्याची निर्मिती होणे खूप गरजेचे आहे. यासाठी महिला व पुरुषांनी एकत्रीत येऊन पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.
इचलकरंजी निर्भया पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, सौ. रुपाली पाटील यांनी महिला व मुलींच्यासाठी निर्भया पथकाची का आवश्यकता आहे त्याची भूमिका व महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इचलकरंजी शहरातील घडलेल्या वास्तव घटनांची माहिती दिली. यासाठी महिला व विद्यार्थिनिनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व अन्याय होऊ नये म्हणून निर्भीडपणे या निर्भया पथकाशी संपर्क साधावा व पुढील अनर्थ टाळावा अशा प्रकारचे सूचनावजा उपदेश त्यांच्याकडून देण्यात आले
सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील सौ.दीपा दोडमणी यांनी भारतात असणारे महिला विषयक कायद्यांची तोंडओळख करून दिली त्याचबरोबर विशाखा समितीचे गठन करण्यासंदर्भात त्यांच्याकडून सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर इचलकरंजी बार असोसिएशनचे वकील यांनी 'बाल गुन्हे व कायदे' याविषयी विद्यार्थिनींना सोप्या भाषेत माहिती देऊन विद्यार्थ्यांना वैचारिक प्रबळ करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी उत्तम दाखले दिले.
इचलकरंजी 'गुन्हे शोध पथकाचे' प्रमुख श्री.अविनाश भोसले यांनी महिला व विद्यार्थिनींना सामोरे जावे लागणाऱ्या प्रश्नासंदर्भात,गुन्हेगार व गुन्हेगारीचे स्वरूप याबाबत उदबोधित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार व उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी असंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थिनींना प्रचंड माहिती व ज्ञान मिळाल्यामुळे या बाबत विद्यार्थिनी घटकाकडून आनंद व समाधान व्यक्त करण्यात आले.
0 Comments