ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचं संघात पुनरागमन झालं असून युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी कसोटी संघात पदार्पण करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होणार आहे. भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाल्यानं मयांक अग्रवालला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही.
रोहित शर्माकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मराठमोळ्या अजिंक रहाणेकडे कर्णधारपद कायम राहणार आहे.
तिसरी कसोटी संघ -
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, आर अश्विन, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,
0 Comments