ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी प्रत्येकवर्षी ‘मिस इंडिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ती करण्यात आली होती. आनंदाची बातमी ही आहे की, ठाण्याची श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत पहिली आली.
श्रुतिका हिचा जन्म इंग्लडला झाला त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्सची पदवीचे शिक्षण घेत आहे.
श्रुतिका म्हणाली की, “मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली, ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे, ज्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय करता येईल, याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले". श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.
ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी सौदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकाना मार्गदर्शन केले. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली.
0 Comments