मुंबई : राज्य कर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे बेरोजगारी वाढली आहे. या बेजबाबदार धोरणामुळे राज्यात हजारोंच्या संख्येने तरूण नोकरी विना भटकत आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे तरूण व्यथीत झाले आहे. एका तरूणाने मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना पञ लिहून आपली व्यथा सांगितली आहे. वाशिमच्या गजानन राठोड या तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरी नसल्याने होणारी घुसमट मांडणार पत्र लिहिले आहे. “मला नोकरी द्या, नाही तर पोरगी पाहून माझ लग्न करुन द्या," अशी मागणी या तरुणाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गजाननने लिहीलेले पञ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गजानन लिहीलेले पञ वाचा : "माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून, आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की, मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही, कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिचे.आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती, असे गजानन राठोड याने मुख्यमंञी ठाकरे यांना लिहीलेल्या पञात म्हंटले आहे.
0 Comments