पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे नंग्या तलवार हातात घेऊन दहशत माजवणे व गावात भीतीचे वातावरण तयार करणे, बेकायदेशीर शास्त्र बाळगणं प्रकरणी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सागर हिंदुराव पासले (वय ३०, रा. आढीव, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल केल्याचे नाव आहे. सागर पासले याला शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली.
सध्या ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे गावागावांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणुकीच्या काळात शस्त्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो तालुक्यातील आडव्या गावात सागर पासले हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना गोपीनिय बातमीदारकडून कळाली.
तालुका पोलीस निरीक्षक सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सपो अशोक जाधव, पो. ना. प्रकाश कोष्टी, नितीन माळी, श्रीराम ताटे हे एक पथक तयार केले. त्या पथकाला खाजगी वाहनाने आढीव गावात पाठवले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे समोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेवुन उभा असलेला दिसला.त्यास गराडा घालुन जागीच पकडले. सागर पासले यांच्या जवळ शस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना नाही. तरीही तो लोखंडी तलवार बेकायदेशीर जवळ बाळगलेल्या परस्थितीत मिळून आला आहे. पथकाकडून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
सागर भोसले यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द शास्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ सह महा पोलीस कायदा कलम १३५, प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो फौ. अशोक जाधव करत आहेत.
0 Comments