माळशिरस तालुक्यात नऊ लाखाचा गुटख्यासह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त


माळशिरस/प्रतिनिधी:

 माळशिरस तालुक्यातील खुडूस या गावाच्या हद्दीत पिकअप वाहनातून ९ लाखांच्या गुटख्यासह १३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माळशिरस पोलीस ठाण्यात भाऊसाहेब महादेव वायदंडे (रा. गिरझणी) व प्रकाश चोरमले (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

माळशिरस पोलिसांकडून कारवाई

माळशिरस तालुक्यातील खुडूस गावाच्या हद्दीमध्ये पोलीस रात्रीची गस्त घालत असताना अप्सरा हॉटेल समोरील एक पिकप वाहन येताना दिसली. पिकअप थांबून पिकअपच्या चालकाला पिकअपमध्ये काय असे विचारले असता. त्याने गाडीत गुटखा व पानमसाला असल्याचे बॉक्स असल्याचे सांगितले.

पिकअप चालकाकडे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल

पोलिसांनी पिकअपचा दरवाजा उघडून पाहिला असता पिकअपमध्ये विमल पानमसाल्याची २० पोती ४ हजार पाकिटे, व्हीवन टोबॅको ४ मोठी पोती ४ हजार ८०० पाकिटे, विमल पानमसाला दोन मोठी पोती ४०० पाकिटे, व्ही वन टोबॅको ३ मोठी पोती ६०० पाकिटे, विमल पानमसाला एक मोठे पोते दोनशे पाकिटे, आरएमडी पानमसाला तीन मोठे बॉक्स १२० पाकिटे, एम. सॅन्टेड टोबॅको तीन मोठे बॉक्स २४० , असे ९ लाख ११ हजार व टमटम किंमत ४ लाख ५० हजार, असा १३  लाख ६१ हजारांचा माल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद भारत भीमराव भोसले सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी दिली. 

मंगळवेढा येथे सात हजार रुपयांचा गुटखा जप्त

कर्नाटक राज्यातून मोटर सायकलवरून मंगळवेढयाकडे येणारा ७ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला. तसेच याप्रकरणी अर्जुन साबळे (वय २८) आणि सर्जेराव साबळे ( दोघे ही रा. हंगिरगे ता.सांगोला) यांना ताब्यात घेतले असून या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही लगत असलेल्या कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात चोरटया मार्गाने गुटखा मंगळवेढयातून अन्य भागामध्ये विक्रीसाठी जात असतो. या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे मंगेश लवटे यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी आज गुरुवारी साडे दहाच्या दरम्यान हुन्नूर येथे सापळा रचला होता.

Post a Comment

0 Comments