"छत्रपती शिवाजी महाराज कन्नड वंशाचेच", कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ सटकली !


आघाडी सरकारमधील वादावरून लक्ष उडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीमा प्रश्न उकरून काढत आहेत, अशी टीका कर्नाटकच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी केली असून आता एक अजब दावाही त्यांनी केला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगावी, कारवार व निपाणी महाराष्ट्रात सामील करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

दावा काय..?

 कर्नाटकातील मराठी भाषिक भाग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित प्रदेश जाहीर करावेत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच केली होती.  त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोल म्हणाले, "ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांचे पूर्वज बेलीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे होते. गदग जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज हे त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी होते," असा दावा त्यांनी केला आहे.

(Advertise)

 तर दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी म्हटलं की, "ठाकरे यांनी मराठी भाषिक भागांचा प्रश्न त्यांच्या सरकारमधील मतभेदांवरून लक्ष उडवण्यासाठी उकरून काढला आहे. त्यांना कोरोनाची साथ हाताळता आली नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता संपुष्टात आली आहे."  सावदी यांनी ठाकरे यांच्या विधानावर 'मुंबई हा कर्नाटकचा भाग करावा व केंद्राने त्या निर्णयापर्यंत मुंबई हा केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा', अशी मागणी केली होती. बेळगावीचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही सांगितले की, 'कर्नाटकची याबाबतची भूमिका कायम आहे.'

Post a Comment

1 Comments