पंढरपूर/प्रतिनिधी:
मकर संक्रांतीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा व मंदिर प्रवेश द्वार आकर्षक फुलांनी न्याहाळून निघाले होते. आजची सजावट पुण्याचे भाविक नवनाथ भिसे ह्यांच्या तर्फे आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच महिलांनी मंदिरात गर्दी केली आहे.
मकर संक्रांती निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी देवाच्या गाभाऱ्यात व मंदिरातील प्रवेद्वारावर तुळस, आष्टर,जरबेरा, झेंडू, शेवंती, आष्टर, कारनेशन, ऑरकेट, बिजली, ग्लाॅडीओ ह्या फुला पासून सजावट करण्यात आली आहे. या शिवाय सोळखांबी, सभा मंडप आणि मंदिराच्या विविध भागात विविध रंगात न्हाऊन निघाले आहे. मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्याने सजविण्यात आले असून. रांगोळी कलाकार संतोष आढळेग यांनी रंगीबिरंगी रांगोळीतून श्रीविठ्ठलाची रांगोळी काढली होती त्यामुळे ही रांगोळी आकर्षणाचा विषय ठरत होती.
रुक्मिणी मातेचे वाण देण्यासाठी महिलांची गर्दी
रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण करीत महिला इतर सवाष्ण महिलांना हे वाण देतात. मंदिर समितीने खास महिलांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केली असून हजारो महिला भाविक आज पहाटेपासून ताटात हळद , कुंकू , तिळगुळ आणि शेतात आलेले ऊस , बोर, गाजर, हुरडा यासह सर्व प्रकारची धान्य अर्थात शेतातील पहिले पीक देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या आहेत. शेतात पिकलेले सर्व प्रकारचे नवधान्य विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातून हजारो महिलांनी आज विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी केली आहे. मात्र कोरोना महामारी मुळे पाच हजार भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येणार आहे.
0 Comments