राष्ट्रीय पातळीवरील कोविड वमन वारियर्स म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपते यांचा सत्कार


बार्शी/प्रतिनिधी:

कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ०४ महिला आय.पी.एस अधिकाऱ्यांचा केंद्रीयमंत्री
मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार.कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या महाराष्ट्रातील चार महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा केंद्रीयमंत्री मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अमरावतीच्या पोलीस आयुक्त श्रीमती आरती सिंह, औरंगबादच्या  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक  तेजस्वी सातपूते आणि मुबई झोन ०५ च्या मा. पोलीस उपायुक्त नियती ठाकर दवे यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनी गौरविण्यात आले. कोरानाच्या कठीण काळात आरती सिंह यांनी नाशिक येथे,  तेजस्वी सातपूते यांनी सातारा येथे, मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद येथे व नियती ठाकर दवे यांनी धारावीत वेळोवेळी विविध योजना राबवून पोलीस दलाचे मनोबल टिकविण्यासह सामान्य नागरिकांना लॉकडाउनच्या काळात सहकार्य करण्याची महत्वाची भूमिका बजावली असून महिला अधिकारी म्हणुन सक्षमपणे काम केले.

(Advertise)

 तेजस्वी सातपूते  या सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत असताना पोलीस दलासाठी स्वतंत्र कोविड रूग्णालय सुरू केले होते. तसेच वंचित घटकांसाठी धान्य वितरण व्यवस्थेत विशेष लक्ष दिले होते.सातारा जिल्हयाचा भाग व सातारा ग्रामीण पोलीस दल अत्यंत मेहनतीने व
सचोटीने प्रयत्नशील राहून सुरक्षित ठेवले. तद्रनंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्हयात कोविड – १९ संसर्गाची परिस्थितीतील प्रभावापासुन ग्रामीण जिल्हयाचा भाग अत्यंत मेहनतीने व सचोटीने प्रयत्नशील राहून सुरक्षित ठेवला आणि या कालावधीत समाजाचे सर्व घटक आणि सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल सुरक्षित ठेवण्यात एक आर्दश घालून दिला आहे. तसेच सदर कालावधील आपण आपली व कुटूंबाची सुरक्षितता कशी राखली पाहिजे याबाबत वेळोवळी मार्गदर्शन केले होते.याकार्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगकडून राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते  यांना सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments