डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत झालेल्या रिकव्हरी नंतर शुक्रवारी सोने महाग झाले आहे. दिल्ली सोन्याच्या बाजारात आज केवळ सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज एचडीएफसी सिक्युरिटीने मौल्यवान धातूंच्या किंमतींबद्दल माहिती दिली आहे. आज सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम २८६ रुपयांनी आणि चांदी ५५८ रुपये प्रतिकिलो झाली आहे.
सोन्याच्या नवीन किंमती
आज दिल्ली बुलियन बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २८६ रुपयांची वाढ झाली आहे आणि आता नवीन किंमत ४८,६९० रुपयांवर पोहोचली आहे. गुरुवारी व्यापारानंतर तो प्रति १० ग्रॅम ४८,४०३ रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने प्रति औंस १,८५२ डॉलर होता.
चांदीच्या नवीन किंमती
तसेच, आजही चांदी चमकत आहे. चांदीच्या किंमतीत आज प्रतिकिलो ५५८ रुपयांची वाढ झाली आहे, त्यानंतर आता नवीन किंमत ६५,१४७ रुपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. गुरुवारी ती प्रति किलो ६४,५९९ रुपयांवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस २५.४० डॉलर आहे.
0 Comments