साळोखे नगर परिसरातील झाडे झाली खिळे मुक्त



कोल्हापूर/प्रतिनिधी:

 'खिळे मुक्त झाडांचे कोल्हापूर', हे अभियान कोल्हापुरातील सर्व सेवा भावी संस्था एकत्रीत येऊन आदरणीय पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोल्हापुरात रविवारी राबविण्यात आले. 

या "खिळे मुक्त झाडांचे कोल्हापूर" या संकल्पनेअंतर्गत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे साळोखे नगर परिसरामध्ये राबविण्यात आली, नवीन झाडे लावणे ही पर्यावरणाची गरज असली तरी असलेल्या झाडांचे संवर्धन होणे हे देखील खूप महत्वाचे आहे.

या साठीच सर्व रॉट्रॅक्टर्स आणि रोटेरिअन्स एकत्रित आले आणि परिसरातील सर्व झाडांवरील मारलेले खिळे, तारा, व विनापरवाना फलक काढण्यात आले. या मोहीमेत तब्बल २ किलो खिळे काढण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष श्री. अरविंद कृष्णन, सचिव सिद्धार्थ पाटणकर, अमर बोडके व सदस्य आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष अभिजीत पाटील, प्रकल्प अधिकारी अथर्व धनाल, यश मालगावे, श्रेयस पाटील, धृव मोदी, गौरव जोशी, सुद्धाशु रुकडीकर, मृण्मयी वडगांवकर व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments