प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने अनेक केंद्रावर पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याकामी प्राआकेंने आपली यंत्रणा अगोदरच सज्ज करून ठेवली होती.
प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर अंतर्गत जयसिंगपूर शहर, चिंचवाड, उदगाव,कोंडीगीरे व संभाजीपूर या शहरी व ग्रामीण भागात पल्स पोलिओ मोहिमेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.त्याचा परिणाम म्हणून दक्ष पालक व आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक सर्व कर्मचारी यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली.
आज या दोन्ही भागात लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद व आरोग्य यंत्रणेकडून केलेली व्यवस्था याच्यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली.आज सकाळी ८.०० वाजता या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सायंकाळी ५ .०० वाजता ही मोहीम संपविण्यात आली.
या मोहिमेसाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन अंकली - उदगाव टोल नाक्यावर पल्स पोलिओचे डोस देण्याचे राष्ट्रीय कार्य मोठ्या उत्साहात उत्तम पद्धतीने पार पाडले. त्याचबरोबर या सर्व पल्स पोलिओ केंद्रावर नाश्त्याची उत्तम सोय 'लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयल ' यांनी करून या राष्ट्रीय कामाला सहकार्य केले.
सदर मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूरचे डॉ. ए.ए.मोघे,डॉ. लखणे, आरोग्य सहाय्यक एस.एम.चवरे,डी.आर.तराळ, सचिन धर्माधिकारी, औषध निर्माण अधिकारी एस.जी.हाके, डी.बी. गायकवाड,सुनील आलासकर आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाधिकारी,रासेयो, प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्रा.मेहबूब मुजावर, रासेयो अमबेसिडर जीवन आवळे,गणेश कुरले,याचबरोबर लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयलचे अध्यक्ष ला. प्रकाश बन्ने,ला. शिवाजी पोवार, ला.बाजीराव पोवार, ला.सचिन कांबळे, ला.सुदर्शन चौगुले,ला.तानाजी बिरंजे ,ला.जे.व्ही. चार्टर्ड प्रेसिडेंट ला.अजित मरसुते ,ला.सुनील शेटे या सर्वांचे सहकार्य लाभले. आजच्या या राष्ट्रीय कामाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments