"...म्हणून आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”


 बिहारमधील एका काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही लस टोचवून घेत शंका दूर करावी, असं आवाहन केलं आहे. ज्या प्रमाणे लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुरुवातीला लस टोचवून घेतली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची लस सुरुवातीलाच टोचवून घ्यावी, असं बिहार विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते अजित शर्मा यांनी म्हटलंय.

या लस निर्मितीचं श्रेय मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. पण सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्या काँग्रेसच्या काळात स्थापन करण्यात आल्या होत्या, असं शर्मा यांनी म्हटलंय. दरम्यान, भारतात ३ कोरोना लसींना मंजुरी मिळाली आहे. देशात आणि जवळपास सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारीही पूर्ण झाली आहे.

Post a Comment

0 Comments