बार्शी/प्रतिनिधी:
कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र, शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही लस पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यातच, केंद्र सरकारने मोफत लसीची घोषणा केली असली, तरी अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे, बार्शी नगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत कोरोना लसीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे.
बार्शी नगर परिषद बार्शीच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील (पिवळ्या शिधापत्रिका धारकांना) अंध अपंग विकलांग इ .ना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी सन २०२०-२०२१ व २०२१-२०२२ च्या अर्थसंकल्पात सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करून शहरातील सर्व दारिद्र्य रेषेखालील (पिवळ्या शिधापत्रिका धारकांना) अंध अपंग विकलांग इ .ना मोफत लसीकरण उपलब्ध करून देणे बाबतचा प्रस्ताव येणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी अक्कलकोटे यांनी पत्राद्वारे केली आहे.
नंदुरबार नगरपरिषदने मनपा अधिनियम १९६५ चे कलम ८१ (४) अन्वये अशा प्रकारे लोकहितवादी निर्णय घेतलेला आहे, त्याच धर्तीवर बार्शी नगरपरिषदनेही असा निर्णय घेऊन गरिबांना दिलासा द्यावा, असेही अक्कलकोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास हजारो बार्शीकरांना याचा फायदा होईल.
0 Comments