बार्शी/प्रतिनिधी ;
दिनांक ०६ / ०१ / २०२१ रोजी बार्शी तहसील कार्यालयासमोर सर्वपत्रकारांचे विविध माग्न्यनसाठी निवेदन बार्शी तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले . बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी म्हणजेच पत्रकार दिनादिवशी हे निवेदन देण्यात आले .
बार्शी येथील सर्व पत्रकार पत्रकार दिनादिवशी आंदोलन करून निवेदन देण्यात आले ,यावेळी बार्शी तालुक्यातील डिजिटल मीडिया [youtobe ] चे सर्व पत्रकार यांना शासन मान्यता मिळावी व जे वयोवृद्ध पत्रकार [ जेष्ठ पत्रकार ] आहेत अशा पत्रकारांना सरकार ने पेन्शन चालू करावी , सर्व पत्रकारांना अधिकृत कार्ड मिळावे , टोल फ्री मिळावा, तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन बांधावे व सर्वांना आरोग्य सवलती मिळाव्यात ,अश्या विविध मागण्यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सर्व पत्रकार बांधवांनी पत्रकार दिनी एकत्रित येऊन केलेले आहे .
तरी या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर करून द्याव्यात अशी मागणी देखील केलेली आहे .
0 Comments